बेटी बचाओ, बेटी पढाओ….अन
तेवढी गाडी नीट शिकावो..

left इंडिकेटर देऊन right ला जात्यात
राव

2.

मुलगी : जानु . . तुझी फार आठवण येत होती म्हणून call केला . . . .

मुलगा (भावुक होऊन) : अगं आत्ताच आपण अर्धा तास बोललो ना . . !

मुलगी : Ohh sorry . . परत तुलाच फोन लागला वाटतं . .

3.

कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले , का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस? ….

काय नाय,

आमच्या सिनिअर नी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं!

कस्टमर इम्म्प्रेस होतंय….

4.

संता परदेशात जाऊन पुन्हा भारतात आला.

घरी आल्यावर बायकोला म्हणाला, मी परदेशी बाबू सारखा दिसतोय का?

बायको – नाही.

संता – मग लंडनमध्ये एक बाई मला विदेशी का म्हणत होती?

5.

एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते…
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवयं?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!!

6.

तो : मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.

ती : msg नको करुस मग..

7.

नवरा – आतापर्यंतच्या अनुभवावरून मला कळलंय की

मूर्ख लोकांना सुंदर बायको मिळते.

बायको – तुम्हाला तर माझं कौतुक करण्याशिवाय दुसरं कामच नाही.

नवरा बेशुद्ध

8.

लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या
प्रेयसी बरोबर लग्न करतो,
आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण
दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर
लग्न करतो…

9.

बर्‍याच वर्षापूर्वी ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढ काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल ,आणि मग तू याला पाठवं, त्याला पाठवं करीत वाटत सुटशील,,जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल.तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही.
हे भविष्य ऐकून मला आनंद झाला…..

अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी वाॅट्स अप बद्दल बोलत होता.

10.

लग्नाचे सात फेरे पूर्ण झाल्यानंतर…

बायको – अहो, ऐका ना!

नवरा – बोल ना!

बायको – आजपासून तुम्ही तिथं मी आणि मी तिथं तुम्ही

लग्नाच्या एक वर्षानंतर…

आज एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी!

11.

एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस : गाडी गॅसवर चालते का?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर चालते?
एडमिन : हफ्त्यावर….
पोलिस जागेवरच ठार!!!

12. जज्ज साहेब : मी तुला कुठे तरी बगितल्यासारखं वाटतय…
.
.
आरोपी : साहेब मी आधी तमाशाच्या फडात ढोलकी वाजवायचो..
सगळी कडे शांतता….

13. दिवाळीची साफसफाई करताना…

बायको – अहो, ऐका ना! ती सुटकेस काढून द्या ना

माझा हात पोहोचत नाही!

नवरा – जिभेनं प्रयत्न कर ना…

नवरा आता आयसीयूमध्ये आहे…

14.

एक दारुडा दारू पिऊन मेला.
आणि मरता मरता
डायलॉग मारून गेला.

दारू तो ब्रँडेड पिता था
पण साला “लिव्हर” ही
खराब निकला…

15.

जास्त समजदार
असणेपण काही उपयोगाच नाही

थोडं येडं असणं पण
गरजेचं आहे नाहीतर
घरातले खुप काम करून घेतात…

16.

बघता-बघता आपल्या लग्नाची २० वर्षे कधी निघून गेली कळलंच नाही…

बघता-बघता तुझी निघून गेली असतील,

माझी ऐकता-ऐकता गेली!

17.

मला ही वाटते माझ्या आयुष्यात,
कोणीतरी असे यावे जो मला.. मला..
.
.
Blank चेक देऊन म्हणेल,
खाली सही केलीय,
तुला हवी ती रक्कम भर…
.
.
आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातुन,
कायमचा चालता हो…

18.

सातवीच्या वर्गात इंग्रजीचा तास नुकताच संपला होता. गुरुजींनी knowledge मध्ये k चा उच्चार होत नाही, wrong मध्ये w चा तसेच psychology मध्ये p चा उच्चार होत नाही , ते सायलेंट असतात असं शिकवलं.

नंतर इतिहासाच्या तासात सरांनी पुण्याची माहिती/महती सांगितली. शेवटी गुरुजींनी एका विद्यार्थ्याला प्रश्न केला
सांग बरे, पुणे तिथे काय उणे असे का म्हणतात?

एक चुणचुणीत मुलगा म्हणाला..

कारण Pune मधला P सायलेंट आहे…!!

19.

नवरा – आज भाकरी जरा जाड झालीय का?

बायको – (भडकून) बाहेर बर्गर जबडा वासून खाता आणि घरात

भाकरी आणि बायको दोन्ही पातळ पाहिजे!

20.

आयुष्यात इतकी मान खाली
घालायची वेळ कधीच
आली नव्हती..
जितकी व्हाट्सअँप, फेसबुक
मुळे आली आहे…!!